- अॅड. विशालभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त महालक्ष्मी महिला बचत गट व युवा मंचाचा उपक्रम..
- कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे; शुभांगी विशाल जाधव यांच आवाहन…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
जाधववाडी (दि. 02 डिसेंबर 2025) :- प्रभाग क्र. २ जाधववाडी, कुळवाडी, चिखली, बो-हाडेवाडी आणि मोशी परिसरातील नागरिकांसाठी अॅड. विशाल भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोन्मुख उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महालक्ष्मी महिला बचत गटाच्या अध्यक्षा शुभांगी विशाल जाधव आणि अॅड. विशाल भाऊ जाधव युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने हे कार्यक्रम राबवले जाणार आहेत.
प्रभागातील बेरोजगार तरुणांसाठी भव्य रोजगार मेळावा गुरुवार, दि. ४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत सेंट्रल हॉल, रामायण मैदान येथे होणार आहे. विविध नामांकित कंपन्या या मेळाव्यात सहभागी होणार असून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
महिलांसाठी सांस्कृतिक आणि मनोरंजनाचा अनोखा मेळा ‘होम मिनिस्टर – खेळ रंगला पैठणीचा’ हा बहुप्रतिक्षित कार्यक्रम शुक्रवार, दि. ५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेत रामायण मैदान, श्री संत सावता माळी मंदिराजवळ, जाधववाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. कॉमेडीचा बादशहा, सुवर्णपदक विजेता अभिनेता ओम यादव या कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहेत.
कार्यक्रमात प्रथम क्रमांकास स्कुटीसह पैठणी, द्वितीय क्रमांकास फ्रिजसह पैठणी, तृतीय क्रमांकास टीव्हीसह पैठणी, चतुर्थ क्रमांकास वॉशिंग मशीनसह पैठणी, पाचव्या क्रमांकास आटा चक्कीसह पैठणी, सहाव्या क्रमांकास टेबल पंखासह पैठणी, सातव्या क्रमांकास मिक्सरसह पैठणी याशिवाय प्रश्न मंजूषा मधील लेकी ड्रॉ विजेत्यास ९ पैठणी देण्यात येणार आहेत.
महालक्ष्मी महिला बचत गटाच्या अध्यक्षा शुभांगी विशाल जाधव यांनी ”आम्ही प्रभागात समाजहिताचे कार्यक्रम आयोजित करत आहोत. रोजगार मेळाव्यात तरुणांना नोकरीच्या संधी आणि ‘खेळ रंगला पैठणीचा’ कार्यक्रमातून महिलांना व्यासपीठ व आनंदाची मेजवानी मिळेल. आपल्या सहभागातून आम्हाला अधिक सेवा करण्याची प्रेरणादेखील मिळेल. त्यामुळे प्रभागातील प्रत्येक महिला आणि तरुणासह नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, अस आवाहन केलं आहे.












