न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.२ मार्च २०२६) :- धूलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर मंगळवार, दिनांक ३ मार्च २०२६ रोजी MahaMetro अंतर्गत धावणाऱ्या Pune Metroची प्रवासी सेवा अंशतः बंद ठेवण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ६.०० ते दुपारी ३.०० या वेळेत मेट्रोची प्रवासी सेवा पूर्णपणे बंद राहील. दुपारी ३.०० नंतर मात्र सेवा पुन्हा सुरू होऊन रात्री ११.०० वाजेपर्यंत नियमित वेळापत्रकानुसार मेट्रो धावणार आहे.
सणाच्या दिवशी कमी प्रवासी संख्या आणि कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन त्यानुसार करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या बदलामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल मेट्रो प्रशासनाने दिलगीर व्यक्त केली आहे.












