न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.२ मार्च २०२६) :- मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या तरुणाला मोटार वाहन न्यायालयाने १५ दिवसांचा साधा कारावास आणि १० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत दि. २५ जून २०२५ रोजी रात्री सुमारे ९.०१ वाजता योगेश देवीदास माळी (वय २८, रा. विठ्ठल मंदिराजवळ, हिंजवडी गावठाण, पुणे) हा यामाहा मोटारसायकल वरून मद्याच्या अंमलाखाली वाहन चालवत असताना हिंजवडी येथे वाहतूक पोलिसांच्या ताब्यात आला. त्याच्यावर मोटार वाहन कायदा कलम १८५ अन्वये कारवाई करून प्रकरण मोटार वाहन न्यायालय, शिवाजीनगर, पुणे येथे पाठविण्यात आले होते.
दि. ०२ मार्च २०२६ रोजी मा. न्यायदंडाधिकारी वर्ग १ पाटील यांनी आरोपीस कलम १८५ अंतर्गत १५ दिवस साधा कारावास व १०,००० रुपये दंड, तसेच कलम १३०(१)/१७७ अंतर्गत ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
पोलीस उप आयुक्त (वाहतूक) विवेक पाटील यांनी नागरिकांना मद्यप्राशन करून वाहन न चालविण्याचे आवाहन केले आहे.












