न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.२ मार्च २०२६) :- मे. आयडीटीआर येथे दि. ०५ व ०६ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या वाहन चालक चाचणीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड यांनी अधिकृत माहिती दिली आहे.
पोलीस निरीक्षक, मोटार परिवहन विभाग, पुणे ग्रामीण यांच्या पत्रानुसार पोलीस अधीक्षक, पुणे यांच्या आस्थापनेवरील रिक्त पोलीस शिपाई (चालक) पदासाठी अर्जदारांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी या दोन्ही दिवशी सकाळच्या सत्रात आयडीटीआर येथे आयोजित करण्यात आली आहे.
त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत आयडीटीआर येथे घेण्यात येणाऱ्या नियमित वाहन चालक चाचण्या दि. ०५ व ०६ मार्च रोजी दुपारी १२ नंतर सुरू होतील. संबंधित उमेदवार व नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड यांनी केले आहे.












