- पत्नीने मारहाणीचा व्हिडिओ काढला…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि.०१ एप्रिल २०२६) :- भोसरी परिसरात एका तरुणाला पत्नी व तिच्या प्रियकराकडून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
सद्गुरु नगर येथे दुपारी अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला.
अमोल संग्राम ढवळे (वय २८) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या पत्नीने त्यांना बोलावून घेतले. त्यानंतर तिने तिच्या प्रियकरासोबत त्यांना घरी नेऊन दारू पाजली. दारूच्या नशेत असताना दोघांनी मिळून त्यांना हाताने व रबरी पाईपने मारहाण केली.
यावेळी आरोपी अजय नात्रे याने लाकडी दांडक्याने चेहरा, मान व पाठीवर वार करून गंभीर जखमी केले. तसेच पत्नीने घराचा दरवाजा आतून बंद करून मारहाणीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.










