न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २१ एप्रिल २०२६) : समाजासाठी निस्वार्थ भावनेने कार्य करणारे स्वर्गीय सुनील बबन साठे यांच्या स्मरणार्थ “सामाजिक कृतज्ञता पुरस्कार” वितरण सोहळा पिंपळे निलख, विशालनगर येथे उत्साहात पार पडला.
राजकारणात पदाची अपेक्षा न करता कायम लोकांना मदत करणारा आणि कार्यकर्त्यांसाठी झटणारा, उपक्रमशील माणूस म्हणजे सचिन साठे हे आहेत, त्यांच्या बरोबर नेहमी खांद्याला खांदा लावून काम करणारा व समाजाप्रती कायम कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता स्वर्गीय सुनील बबन साठे यांचे नाव घ्यावे लागेल असे पुणे शिक्षण मंडळाचे माजी सचिव जयसिंग डुंबरे यांनी सांगितले.
सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात सत्कारमूर्ती सुभाष धोंडीराम इंगळे यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि ११,५०१ रुपयांची रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी जयसिंग डुंबरे यांनी सुनील साठे हे समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारे कार्यकर्ते असल्याचे सांगितले. सचिन साठे यांनी त्यांच्या कार्याची आठवण करून देत हा पुरस्कार दरवर्षी देण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमास सचिन साठे सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन साठे, नगरसेवक स्नेहा कलाटे, भुलेश्वर नांदगडे, काळुराम नांदगुडे, नरेंद्र गायकवाड, रंगनाथ थोपटे, संजय केदारी, अनंत कुंभार, अशोक मेंगळे, अशोक बनसोडे, राजाभाऊ मासूळकर, संभाजीराव इंगवले आदी मान्यवर उपस्थित होते.











