- महापौर रवि लांडगे यांची मुलाखत उद्या दिनांक २२ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी आकाशवाणीच्या पुणे अ केंद्रावरून प्रसारित होणार…
- न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २१ एप्रिल २०२६) :- पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांनी नुकतीच आकाशवाणी पुणे केंद्राला सदिच्छा भेट दिली. या सदिच्छा भेटीत आकाशवाणी पुणे अ केंद्र आणि विविध भारती या दोन्ही स्टुडिओंद्वारे कशाप्रकारे कामकाज चालते याबाबत त्यांनी माहिती घेतली.
या भेटीदरम्यान त्यांनी आकाशवाणीच्या अभियांत्रिकी विभागाचे उपमहासंचालक अधीर गडपाले व प्रादेशिक वृत्त विभागाचे सहाय्यक संचालक माधव जायभाये यांच्याशी चर्चा करून आकाशवाणी पुणे केंद्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी, या केंद्राद्वारे प्रसारित होणारे कार्यक्रमांचे स्वरूप तसेच प्रादेशिक वृत्त विभागाद्वारे प्रसारित होणारी विविध बातमीपत्र आणि वृत्तविषयक कार्यक्रम आदींबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.
लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे कामकाज जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यामध्ये आकाशवाणी या प्रसार माध्यमाची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण आहे;असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आकाशवाणीवरून प्रसारित होणारा मन की बात हा कार्यक्रम, आकाशवाणीच्या बातम्या, शेतकऱ्यांसाठीचे व कामगारांसाठीचे तसेच महिलाविषयक कार्यक्रम, साप्ताहिक कीर्तनाचा कार्यक्रम आदी उपक्रमांबद्दल महापौर लांडगे यांनी समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी प्रादेशिक वृत्त विभागातील हंगामी वृत्त निवेदक योगेश रांगणेकर यांनी महापौर रवी लांडगे यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कामकाजा संदर्भात मुलाखत घेतली.
ही मुलाखत उद्या दिनांक २२ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी आकाशवाणीच्या पुणे अ केंद्रावरून प्रसारित करण्यात येणार आहे. तसेच प्रसारणानंतर सदर मुलाखत युट्युब वाहिनीवरही प्रसारित केली जाईल.
आकाशवाणी पुणे केंद्राला सदिच्छा भेट हा एक संस्मरणीय क्षण असल्याचे मत महापौर रवी लांडगे यांनी यावेळी व्यक्त केले.










