न्यूज पीसीएमसी नेटवर्क
दिघी (दि. २२ एप्रिल २०२६) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय क्षेत्रात शस्त्रबंदीचे आदेश लागू असतानाही, बेकायदेशीररीत्या देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका २० वर्षीय तरुणाला दिघी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई मॅगझिन चौक परिसरातील कोमल इंडस्ट्रीज ते वाळके मळा जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी (दि. २१) रात्री करण्यात आली.
उमेश उर्फ अजय रेमालीबाई ब्रम्हणे (वय २० वर्ष, रा.येरवडा, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या जवळ
१ देशी बनावटीचे पिस्तूल आणि १ जिवंत काडतूस (एकूण किंमत ५१,००० रुपये) इतका मुद्देमाल जप्त केला आहे
दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सुधीर हरिशचंद्र डोळस यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी शहरात १५ एप्रिल ते २८ एप्रिल २०२६ या कालावधीत शस्त्रबंदीचा आदेश लागू केला आहे. या आदेशानुसार कोणत्याही प्रकारचे घातक शस्त्र, तलवारी, बंदुका किंवा इजा पोहोचवणारी वस्तू बाळगण्यास सक्त मनाई आहे.
मंगळवारी रात्री १९.५० च्या सुमारास आरोपी उमेश ब्रम्हणे हा मॅगझिन चौक परिसरात संशयास्पदरीत्या वावरत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस मिळून आले. स्वतःच्या वापरासाठी हे शस्त्र त्याने बेकायदेशीररीत्या लपवून ठेवले होते.
आरोपीविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुसळे करत आहेत.











