न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २८ एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवडमधील रुपीनगर परिसरातील अंकुश चौकात सोमवारी एक व्यक्ती हायटेन्शन वीज टॉवरवर चढल्याने मोठी खळबळ उडाली. या घटनेमुळे परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.

माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलिस, अग्निशमन दल तसेच महावितरणचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. संबंधित व्यक्तीला खाली उतरवण्यासाठी प्रशासनाकडून वारंवार समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.
तसेच काही स्थानिक नागरिक आणि त्या व्यक्तीच्या ओळखीच्या लोकांनीही त्याच्याशी संवाद साधत खाली येण्याचे आवाहन केले. मात्र, तो बराच वेळ टॉवरवरच ठामपणे उभा राहिल्याने बचाव पथकासमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते.
ही व्यक्ती टॉवरवर नेमकी कोणत्या कारणासाठी चढली आणि त्याची मागणी काय आहे, याबाबत रात्री उशिरापर्यंत कोणतीही स्पष्ट माहिती मिळू शकली नाही.











