- आमदार अमित गोरखे यांचा इशारा…
- पिंपरी-चिंचवडमध्ये जीवघेण्या ओव्हरहेड वायरिंगविरोधात आक्रमक भूमिका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २८ एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत केबल आणि इंटरनेट वायरींच्या जाळ्यामुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असून, सेक्टर २६ येथे घडलेल्या घटनेत श्रीमती संपदा पटवर्धन यांचा मृत्यू झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी आमदार अमित गोरखे यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र टीका करत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
प्रबोधन सोसायटी परिसरात लोंबकळणाऱ्या वाय-फाय केबलमुळे हा अपघात घडल्याचे समोर आले आहे. संबंधित कंपन्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांचा परवाना रद्द करावा, तसेच शहरातील सर्व धोकादायक केबल्स २४ तासांत हटवाव्यात, अशी मागणी गोरखे यांनी केली आहे.
मृत व्यक्तीच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यासोबतच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.












