- नवोन्मेष व संशोधनातून ‘विकसित भारत’ घडवण्यावर भर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २८ एप्रिल २०२६) :- पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ येथे ‘असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज्’ (AIU) च्या १०० व्या वार्षिक महासभा व कुलगुरूंच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते झाले. २८ ते ३० एप्रिलदरम्यान होणाऱ्या या परिषदेत देशभरातील ३०० हून अधिक कुलगुरू व शिक्षणतज्ज्ञ सहभागी झाले आहेत.
उद्घाटनप्रसंगी राज्यपालांनी नवोन्मेष, संशोधन आणि सर्वसमावेशक शिक्षणाच्या माध्यमातून ‘विकसित भारत २०४७’ साध्य करण्यावर भर दिला. विद्यार्थ्यांनी केवळ ज्ञानी न राहता समस्या सोडवणारे नागरिक बनावे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी मूल्याधिष्ठित शिक्षणाची गरज अधोरेखित केली. परिषदेत उच्च शिक्षणातील नव्या दिशांवर व्यापक चर्चा होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.












