न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १ मे २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी आकाश चिन्ह विभागाच्या उपआयुक्तांकडे प्रभाग क्र. १६ मधील अनधिकृत बॅनर, फ्लेक्स तसेच वायफाय व केबल वायर तात्काळ हटविण्याबाबत निवेदन दिले आहे.
प्रभागातील विविध ठिकाणी फुटपाथ, सार्वजनिक रस्ते व स्ट्रीट लाईटच्या खांबांवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बॅनर व फ्लेक्स लावण्यात आलेले असून स्ट्रीट लाईट खांबांवर टाकलेल्या वायफाय व केबल वायरमुळे शहराचे सौंदर्य बिघडत आहे. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होत आहे.
यामुळे संबंधित विभागाने तात्काळ कारवाई करून सर्व अनधिकृत साहित्य हटवावे व भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.













