न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १ मे २०२६) :- Nationalist Congress Party च्या वतीने खराळवाडी, पिंपरी येथील कार्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शहराध्यक्ष Yogesh Behl यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीचा गौरव करत १०५ हुतात्म्यांना अभिवादन केले तसेच कामगारांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. बुद्ध पौर्णिमेनिमित्तही शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमात सेवादल कार्यकारिणीचा विस्तार करत विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, ॲड. गोरक्ष लोखंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
उत्साही वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग दिसून आला.













