न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ४ मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अ प्रभागात आगामी जनगणना २०२६-२७ मोहिमेसाठी प्रशासकीय तयारीला वेग आला असून निगडी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात प्रगनक व पर्यवेक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण सुरू झाले आहे.
२५ एप्रिलपासून ८ मेपर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात १२ बॅचेसमधील ५२५ प्रगनकांना दररोज सकाळी ९.३० ते सायं. ५.३० दरम्यान तांत्रिक व क्षेत्रीय मार्गदर्शन दिले जात आहे. प्रशिक्षक राजू कोंढवडे, केदार शंकर, प्रणव गुरव व तुषार बारगे मार्गदर्शन करत आहेत.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, महापौर रवी लांडगे व अधिकारी निवेदिता घारगे यांनी नागरिकांना १ ते १५ मेदरम्यान स्वगणना नोंदविण्याचे आवाहन केले. बाळू महाजन, पवार गोरक्ष, बोंबले संदीप, पाटील राजेंद्र, भोसले बाबुराव, दिपाली मोहिते, डॉ. माधुरी पवार, नीता वाघमारे, तनुजा नेमाडे यांनी सहभाग घेतला. प्रास्ताविक बाळू महाजन तर आभार शाम पोटघन यांनी मानले.















