- ६ ते १० मे दरम्यान भोसरीत स्पर्धा…
- चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ४ मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २०२६-२७ चे आयोजन ६ ते १० मेदरम्यान भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील गावजत्रा मैदानावर करण्यात आले आहे. उद्घाटन दि. ६ मे रोजी सायं. ६ वाजता राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार असून सुमारे ६५० खेळाडू सहभागी होणार आहेत.
कार्यक्रमास मुरलीधर मोहोळ, सुनेत्रा पवार, महापौर रवी लांडगे उपस्थित राहणार आहेत. तसेच दत्तात्रय भरणे, नीलम गोऱ्हे, अण्णा बनसोडे, माधुरी मिसाळ, सुप्रिया सुळे, पार्थ पवार, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे आदी मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे.
उपआयुक्त पंकज पाटील यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले आहे.













