- हिंदूंच्या संयमाचा अंत पाहू नका – आमदार जगताप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ४ मे २०२६) :- काळेवाडीत रविवारी कथित बेकायदेशीर धर्मांतराविरोधात ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. पंचनाथ चौक ते आबाजी नाणेकर चौक दरम्यान निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. आमदार शंकर जगताप यांनी प्रशासनाला इशारा देत, “हिंदूंच्या संयमाचा अंत पाहू नका,” असे सांगितले.
या मोर्चात गोपीचंद पडळकर, उमा खापरे, ॲड. वर्षाताई डहाळे, शत्रुघ्न काटे, प्रशांत शितोळे, विनोद नढे, नीता पाडाळे, कोमल काळे, वैशाली खाडये, ॲड. हर्षद नढे, काळूराम नढे आदी उपस्थित होते.
विज्ञानविरोधी दावे करून धर्मांतर घडवले जात असल्याचा आरोप करत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, आरोपींना अटक, अंधश्रद्धा पसरवणाऱ्या प्रार्थनास्थळांची चौकशी आणि मोक्का अंतर्गत कारवाई या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.













