न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ४ जून २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मालमत्ता कर संकलन मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, १ एप्रिल ते ४ जून २०२६ या कालावधीत तब्बल २८९ कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता कर** जमा झाला आहे. आतापर्यंत २ लाख ७८ हजार १७ मिळकतधारकांनी कर भरला असल्याची माहिती कर आकारणी व कर संकलन विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी दिली.
महापालिकेने ३० जूनपूर्वी कर भरणाऱ्या नागरिकांसाठी विविध सवलती जाहीर केल्या आहेत. विशेषतः ऑनलाइन कर भरणाऱ्यांना १० टक्क्यांपर्यंत सवलत मिळत असल्याने डिजिटल व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आतापर्यंत २ लाख ४९ हजार १४३ नागरिकांनी ऑनलाइन कर भरून २६५ कोटी ८६ लाख रुपयांचा भरणा केला आहे.
शहरात एकूण ७ लाख ४४ हजार ६३० नोंदणीकृत मालमत्ता असून, महिला बचत गटांच्या माध्यमातून घरपोच कर बिल वाटप मोहीम राबविण्यात आली आहे. तसेच थकबाकीदारांविरोधात कारवाई सुरू असून, ३५ हजारांहून अधिक जप्तीपूर्व नोटिसा** बजावण्यात आल्या आहेत.
महिलांच्या नावावरील निवासी मालमत्ता, दिव्यांग व्यक्ती आणि पर्यावरणपूरक गृहनिर्माण संस्थांसाठी विशेष सवलती लागू करण्यात आल्या आहेत. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांनी ३० जूनपूर्वी मालमत्ता कर भरून सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. उपायुक्त सचिन पवार यांनीही डिजिटल माध्यमातून कर भरणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे सांगत नागरिकांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता कर भरण्याचे आवाहन केले.















