न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मोशी (दि. १२ जून २०२६) :- मोशी येथील जय गणेश लॉनमध्ये अधिक मासानिमित्त महाराष्ट्रातील सर्वांत मोठा लक्ष्मी-नारायण पूजन सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि शिवांजली सखी मंचच्या प्रमुख पूजा लांडगे यांच्या पुढाकारातून आयोजित या सोहळ्यात राज्यभरातून आलेल्या तब्बल 330 हून अधिक ब्राह्मण दांपत्यांचे विधिवत पाद्यपूजन, लक्ष्मी-नारायण पूजन, सन्मान व स्नेहभोजन आयोजित करण्यात आले.
वेदमंत्रांच्या मंगलमय घोषात पार पडलेल्या या कार्यक्रमात धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांसह हजारो भाविक सहभागी झाले होते. अधिक मासाच्या पावन पर्वानिमित्त धर्म, संस्कृती आणि सनातन परंपरांचे जतन व संवर्धन करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यावेळी आमदार महेश लांडगे म्हणाले, “अधिक मास हा आत्मशुद्धी, संस्कार संवर्धन आणि समाजप्रबोधनाचा कालखंड आहे. सनातन संस्कृतीची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी असे उपक्रम आवश्यक आहेत.” या सोहळ्यामुळे श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचला.















