न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. 23 सप्टेंबर 2026) :- जय भवानी मित्र मंडळ दरवर्षी लहान मुले आणि महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक उपक्रम राबवित असते. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून चार आनंदाचे क्षण सर्वांना अनुभवता यावेत, यासाठी मंडळ सर्वांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत असते. त्यामुळे परिसरातील सर्व महिला व मुले गणेशोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात.
त्याचाच एक भाग म्हणून यंदा मंडळाने महिलांसाठी खास ‘होम मिनिस्टर’ या लोकप्रिय स्पर्धेचे आयोजन केले होते. पावसाचे वातावरण असतानाही या स्पर्धेला शेकडो महिलांनी उल्लेखनीय उपस्थिती नोंदवत उत्साहात सहभाग घेतला.
स्पर्धेचे सूत्रसंचालन संदेश पारकर आणि रोहन कांबळे यांनी आपल्या अनोख्या आणि खुमासदार शैलीने केले. स्पर्धेची सुरुवात हास्यविनोद आणि मनोरंजक प्रश्नांनी झाली. योग्य उत्तर देणाऱ्या महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. महिलांनी सादर केलेल्या बहारदार उखाण्यांनी स्पर्धेत चांगलीच रंगत आणली. विविध खेळांमध्ये स्पर्धक महिलांनी उत्साहात सहभाग घेतला. जसजशी स्पर्धा पुढे जात होती, तसतशी स्पर्धकांमध्ये चुरस आणि प्रेक्षकांमध्ये उत्कंठा वाढत होती.
स्पर्धेचा निकाल…
प्रथम क्रमांक: सौ. सुष्मा जराड, द्वितीय क्रमांक लता महंकाळे तृतीय क्रमांक सारिका तावरे
विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण नगरसेविका अर्चना तापकीर आणि राष्ट्रवादी महिला उपाध्यक्ष अश्विनी तापकीर यांच्या हस्ते करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष संजय जराड यांच्यासह चंद्रकांत तापकीर, शशिकांत तापकीर, मनोज शिंदे, संतोष जराड, गणेश वाबळे, स्वप्निल नवथरे, राहुल तावरे, महेश तावरे, आकाश कवितके, अमृत यादव, प्रथमेश टावरे, ओम तापकीर, निखिल घाडगे, सागर वाघमारे, अक्षय जराड, आर्यन जराड, शुभम डोंगरे, सोहम जराड, सुशील सिंग, हितेश बर्गे, अजय साळुंखे, दत्ता झाडे, स्वराज झाडे, भारत झाडे, रोहित चव्हाण, सुमित अडागळे, सतीश गुप्ता, पंकज गुप्ता, सिद्धार्थ वाघमारे, विकास पाल, सुनील घोडके, आर्यन गायकवाड, रहीम धोबी ,आयुष अडागळे, सुमित पंडित ,प्रणव पाटील, नाना म्हस्के ,गुड्डू निकाळजे, खांडेकर या सर्व कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.


















