- निगडीतील अपघाताच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका ऐश्वर्या तरस यांची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. 23 सप्टेंबर 2026) :- पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत परवाना रद्द अथवा वैध परवान्याशिवाय कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महापालिका हद्दीत अनेक कचरा वाहतूक वाहने आवश्यक परवाना नसतानाही रस्त्यावर धावत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. निगडी परिसरातील नुकत्याच झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर अशा वाहनांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक असल्याचे तरस यांनी निवेदनात नमूद केले.
परवाना रद्द किंवा वैध परवाना नसलेली वाहने तात्काळ जप्त करून त्यांच्यावर बंदी घालावी, तसेच संबंधित वाहनमालक, कंत्राटदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सर्व कचरा वाहतूक वाहनांची परवाना पडताळणी करून विशेष तपासणी मोहीम राबवावी आणि बेकायदेशीर वाहनांची यादी जाहीर करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.


















