- १४, १९, २०, २४ आणि २५ सप्टेंबरला पूर्णवेळ, तर इतर दिवशी सायंकाळी ५ ते मध्यरात्रीपर्यंत निर्बंध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड | २३ सप्टेंबर २०२६ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गणेश विसर्जन मिरवणुका आणि त्यासाठी होणारी नागरिकांची गर्दी लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने शहरातील विविध मार्गांवर जड-अवजड वाहनांना तात्पुरती प्रवेशबंदी लागू केली आहे. मिरवणुकांच्या मार्गांवर वाहतूक कोंडी होऊ नये आणि नागरिकांची वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावरही गणेशोत्सव काळातील वाहतूक व कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित अद्ययावत माहिती प्रसिद्ध केली जात आहे.
पोलीस उपआयुक्त, वाहतूक शाखा विक्रांत देशमुख यांनी मोटार वाहन कायद्यानुसार ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता जड-अवजड वाहनांना खालील मार्गांवर प्रवेशबंदी राहणार आहे.
भोसरी वाहतूक विभाग…
- दिघी रोड, गंगोत्री पार्क ते संविधान चौक, भोसरी.
- बनाचा ओढा ते माई वडेवाले, आळंदी रोड, भोसरी.
- जायका टी जंक्शन ते गावजत्रा मैदान ते भाजी मंडई, धावडे वस्ती प्रवेशद्वार, भोसरी महामार्गावरील दोन्ही बाजूंचे सर्व्हिस रोड.
- लांडेवाडी चौक ते पीसीएमटी चौक ते चांदणी चौक, भोसरी.
निगडी वाहतूक विभाग…
- चिंचवड स्टेशन–लोकमान्य हॉस्पिटल–अहिंसा चौक–चाफेकर चौक–जुना जकात नाका–थेरगाव घाट.
- कालिकामाता मंदिर–लिंकरोड–एल्प्रो मॉल–मोरया हॉस्पिटल चौक–चाफेकर चौक–जुना जकात नाका–थेरगाव घाट.
- विठ्ठल मंदिर–पॉवर हाऊस चौक–भोई आळी–चाफेकर चौक–आलमगीर मस्जिद–गांधी पेठ–मोरया गोसावी मंदिर–मोरया घाट.
- टिळक चौक–गणेश तलाव–संभाजी चौक–विठ्ठल मंदिर–आकुर्डी परिसरातील मार्ग.
पिंपरी वाहतूक विभाग…
- लिंक रोड ते भाटनगर कॉर्नर, भाटनगर ते मेन बाजारामध्ये जाण्या-येण्याचा मार्ग.
- शगुन चौक ते साई चौक, आर्य समाज चौक ते कराची चौक, संपूर्ण रिव्हर रोड, डिलक्स चौक ते काळेवाडी पूल.
- साई चौक ते गेलार्ड चौक–शास्त्री गार्डन चौक–नव महाराष्ट्र विद्यालय.
- डिलक्स चौक ते श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, पिंपरी गाव.
- पवनेश्वर मंदिर ते सर्जा हॉटेल, पुढे वैभवनगर ते काळेवाडी पूल.
- जाधव वडेवाले चौक ते रहाटणी पूल.
- पिंपरी चौक ते पिंपरी पूल तसेच मोरवाडी चौक ते पिंपरी पूल.
- वल्लभनगर अंडरपास ते नेहरूनगर चौक (संतोषीमाता चौकापर्यंत), संपूर्ण संत तुकारामनगर परिसर.
- नेहरूनगर चौक ते तब्बकल मज्जिद.
- संतोषीमाता चौक (नेहरूनगर चौक) ते आंबेडकर चौक (पिंपरी चौक).
- आंबेडकर चौक (पिंपरी चौक) ते आहिल्यादेवी चौक (मोरवाडी चौक).
- आहिल्यादेवी चौक (मोरवाडी चौक) ते सम्राट चौक.
- सम्राट चौक ते झिरो बॉईज चौक.
- केएसबी चौक ते बसवेश्वर चौक, पुढे महावीर चौक चिंचवड तसेच संपूर्ण मोहननगर व काळभोरनगर परिसर.
- मदर तेरेसा ब्रिज ते एम्पायर सोसायटी–ऑटो क्लस्टर रोड–मा. आयुक्त बंगला चौक–केएसबी चौक.
- मा. आयुक्त बंगला चौक ते मोरवाडी कोर्ट रोड ते सम्राट चौक.
बावधन वाहतूक विभाग…
- सुस ब्रिज ते नांदेगावकडे जाणारा मार्ग.
- राधा चौक ते नांदेकडे जाणारा मार्ग.
- अरिहंत कॉलेज, उत्तमनगरकडून ओंकार गार्डन अंडरपासमार्गे डी.एस.के. रानवारा सोसायटीकडे जाणारा मार्ग.
वाकड वाहतूक विभाग…
- अण्णा भाऊ साठे चौक येथून दत्त मंदिर रोडकडे जाणारा मार्ग.
- वाकड चौकाकडून दत्त मंदिर रोडकडे जाणारा मार्ग.
- उत्कर्ष चौकाकडून दत्त मंदिर रोड, वाकडकडे येणाऱ्या वाहनांना म्हातोबा चौक येथे प्रवेशबंदी.
- जाणोबा चौक–दत्त मंदिर रोड–माऊली चौक–सम्राट चौक मार्ग.
सांगवी वाहतूक विभाग…
- काळेवाडी, थेरगाव, नवी सांगवी, जुनी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर आणि पिंपळे निलख येथील रहिवासी भागातील ये-जा मार्गांवर जड-अवजड वाहनांना प्रवेशबंदी.
हिंजवडी वाहतूक विभाग…
- टाटा टी जंक्शन चौक फेज-३कडून टाटा टी जंक्शन चौक, जिओमेट्रिक सर्कलमार्गे शिवाजी चौकाकडे जाणारी जड-अवजड वाहतूक.
- जिओमेट्रिक सर्कल चौक, माणगाव–विप्रो सर्कल फेज-१कडून जिओमेट्रिक सर्कलमार्गे मेझा-९ चौक व शिवाजी चौकाकडे जाणारी वाहतूक.
- मेझा-९ चौक, लक्ष्मी चौकाकडून मेझा-९ चौकमार्गे शिवाजी चौकाकडे जाणारी वाहतूक.
- शिवाजी चौक–मेझा-९ चौकातून शिवाजी चौकाकडे डावीकडे वळून तसेच साखरे वस्ती व इंडियन ऑईल चौकातून शिवाजी चौकाकडे उजवीकडे वळून हिंजवडी गावठाणकडे जाणारी वाहतूक.
- इंडियन ऑईल चौक–वाकड नाक्याकडून इंडियन ऑईल चौकमार्गे जांभुळकर जिम चौक व शिवाजी चौकाकडे जाणारी वाहतूक.
- कस्तुरी चौक–मारुंजी वाय जंक्शन व इंडियन ऑईल चौकाकडून कस्तुरी चौकमार्गे शिवाजी चौक, हिंजवडीकडे जाणारी वाहतूक.
देहूरोड वाहतूक विभाग…
- कृष्णा चौक ते मुकाई चौक.
- रावेत एक्झिट ते मुकाई चौक.
- खंडेलवाल (काळोखे पाटील चौक) ते परंडवाल चौक बायपास.
- खंडेलवाल (काळोखे पाटील चौक) ते देहू मुख्य कमान.
- साईराज चौक ते परंडवाल चौक.
- भैरवनाथ चौक ते १४ टाळकरी कमान.
- देहू कमान, मुंबई-पुणे हायवेकडून देहूगावकडे जाणारा मार्ग.
- गुरुद्वारा चौक ते देहूरोड बाजार.
- सवाना चौक ते विकासनगर–आदर्शनगर.
चिखली वाहतूक विभाग…
- देहू-आळंदी रोडवरील वेदांत हॉटेल कॉर्नर ते जय भारत चौक (वैशाली स्वीट चौक).
- मोशी चौक ते वाय पॉईंट, हवालदार वस्ती.
- कृष्णानगर भाजी मंडई चौक ते चिखली चौक.
- नेवाळे वस्ती कॉर्नर ते पिंगळे चौक.
- ज्योतिबानगर चौक ते पिंगळे चौक ते पाटीलनगर पंचर (सोनवणे वस्ती रोड).
- दक्षिणमुखी हनुमान मंदिर ते कुदळवाडी सर्कल ते डायमंड चौक.
- वुड्स व्हिले सोसायटी ते लक्ष्मी चौक ते नवीन कोर्ट चौक.
- टॉवर लाईन चौक ते ज्योतिबानगर चौक.
दिघी-आळंदी वाहतूक विभाग…
- आळंदी फाटा, चाकण येथून आळंदी शहराकडे जाणारा मार्ग.
- चिंबळी फाटा, चाकण येथून आळंदी शहराकडे जाणारा मार्ग.
- शेलपिंपळगाव–वडगाव घेनंद ते आळंदी शहराकडे जाणारा मार्ग.
- धानोरे फाटा, मरकळ येथून आळंदी शहराकडे जाणारा मार्ग.
- विश्रांतवाडी रोडने देहूफाटा येथून आळंदी शहराकडे जाणारा मार्ग.
पाच दिवशी पूर्णवेळ बंदी…
गणेशोत्सवाच्या कालावधीत १४ सप्टेंबर, १९ सप्टेंबर, २० सप्टेंबर, २४ सप्टेंबर आणि २५ सप्टेंबर २०२६ रोजी वरील मार्गांवर जड-अवजड वाहनांना पूर्णवेळ प्रवेशबंदी करण्यात आली आहे. उर्वरित दिवसांमध्ये सायंकाळी ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत जड-अवजड वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे.
अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या निर्बंधातून वगळण्यात आले आहे. वाहनचालकांनी संबंधित कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त विक्रांत देशमुख यांनी केले आहे.

















