न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड आयुक्तलयामध्ये गुन्हे शाखेच्या सहायक आयुक्तपदी आर. आर. पाटील व श्रीधर जाधव यांची नियुक्ती केली आहे. गुरुवारी (दि. २०) रोजी पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी याबाबतचे आदेश दिले. आयुक्त पद्मनाभन यांनी यापूर्वी तीन पोलिस ठाण्यांसाठी एका युनिटची निर्मिती केली आहे.
राजाराम रामराव पाटील यांच्याकडे एसीपी क्राईम १ म्हणून भोसरी, पिंपरी, चाकण या तीन युनिटसह खंडणी / दरोडा प्रतिबंधक विभाग, तांत्रिक विश्लेषण पथक, अमली पदार्थविरोधी पथक, आर्थिक गुन्हे शाखेची जबाबदारी सोपवली आहे. तर, एसीपी क्राईम २ म्हणून श्रीधर जाधव यांच्याकडे वाकड, देहूरोड या युनिटसह गुन्हे प्रतिबंधक शाखा, एमओबी आदी विभागाची जबाबदारी सोपवली आहे.


















