न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जून २०१९) :- एमआयडीसीतील ॲमेझॉन कंपनीच्या गोदामातून ४ लाख ५० हजारांचा माल घेऊन निघालेल्या टेम्पोचालकाला धमकावून दोन चोरट्यांनी टेम्पो पळवून नेला. ही घटना गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास भोसरी एमआयडीसीतील ॲमेझॉन कंपनीच्या गोडावूनजवळ घडली.
याप्रकरणी त्रिवणे धनुषधारी यादव (वय २८, रा. नवजीवन हौसिंग सोसायटी, नेहरुनगर) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यादव यांचे भोसरी एमआयडीसीत गोडावून आहे. गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांना ४ लाख ५० हजारांचा माल घेऊन गोडाऊनच्या गेट बाहेर पडताच चोरट्यांनी टेम्पोचालकाला धमकावून टेम्पो पळवला.


















