न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जून २०१९) :- किरकोळ कारणावरून चौघांनी एका तरुणाला अडवून लाकडी दांडक्याने मारहाण केली. मारहाणीत तरुणाच्या गळ्यातील सोनसाखळी गहाळ झाली. चिंचवड, वाल्हेकरवाडी येथे बुधवारी (दि. १९) रात्री आठ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.
याप्रकरणी स्वप्निल वाघमारे, किरण खवले, नाया आणि बंट्या या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे तर, नीलेश ज्ञानेश्वर आहेर (वय ३५, रा. आहेरनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांनी वाघमारे याला, तू भांडण का करतोस, अशी विचारणा केली. त्या कारणावरून चिडून त्याने लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरवात केली. तसेच, इतर तिघांनीही लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, सहायक निरीक्षक आर. टी. शेवाळे तपास करीत आहेत.


















