न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. ०९ नोव्हेंबर २०२६) :- दीपावली सणाच्या निमित्ताने गीत – संगीतमय मैफिलीचे आयोजन करीत सांस्कृतिक बांधिलकीची जाण ठेवत सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून पिंपळे सौदागर येथील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक शत्रुघ्न बापू काटे, नगरसेविका डॉ. कुंदा भिसे आणि अनिता काटे यांनी दुष्काळग्रस्तांसाठी दोन लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री निधीला दिली.
शनिवार दि. ७ रोजी ” स्वरामृत दिवाळी पहाट” या कार्यक्रमात ही मदत जाहीर करण्यात आली. तत्पुर्वी लिनियर गार्डन येथे किराणा घराण्याचे ख्यातनाम गायक पं. यादवराज फड यांच्या गायनाची दर्जेदार मैफिल रंगली. उन्नती सोशल फाउंडेशन, शत्रृघ्न काटे यूथ फाऊंडेशन आणि नगरसेविका अनिता संदीप काटे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या मैफिलीचा प्रारंभ पं. यादवराज फड यांनी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र हे ईश स्तवन , जय जय रामकृष्णहरी, रूप पहाता पहाता लोचनी, जय जय विठ्ठल रखुमाई या पारंपरिक पंचपदीने केली.
त्यानंतर पंढरी निवासा सख्या पांडुरंगा, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, बाजे रे मुरली या बाजे या काही भक्तीरचना सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. सदर मैफिलीत पंडीतजीसह शिल्पा आठले यांनी कानडा राजा पंढरीचा. भाग्यदा लक्ष्मी बातम्या, सोहम हर डमरु भाजे या रचनांव्दारे रसिकांची दाद मिळविली. याच मैफिलीत नगरसेविका कुंदा भिसे यांनी संताचीये पायी खर्चाने शरीर ही संत नामदेवांची रचना सादर केली. युवा कलावंत सोहम काटे याने गिटारवाजनाव्दारे प्रेमगीत सादर केले. परिसरातील नाट्य कलावंत उमेश धूत यांनी नटसम्राट या नाटकातील एक प्रसंग सादर केला.
















