- नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची धाव..
- अग्निशमन दलाच्या त्वरित कारवाईतून मोठा अनर्थ टळला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०९ नोव्हेंबर २०२६) :- पिंपळे सौदागर येथील साई मॅरीगोल्ड सोसायटीमध्ये अचानक आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच नगरसेवक श्री शत्रुघ्न काटे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि अग्निशमन दलाला त्वरित सूचना दिली.
सूचना मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या कमी वेळात घटनास्थळी पोहोचल्या आणि आग नियंत्रणात आणण्यासाठी बचावकार्य सुरू केले. नगरसेवक श्री शत्रुघ्न काटे यांनी घटनास्थळी परिस्थितीचा आढावा घेत अग्निशमन दलाशी संपर्क साधून आवश्यक उपाययोजना त्वरित करण्याचे निर्देश दिले.
घटनास्थळी नगरसेविका अनिता काटे, नगरसेविका कुंदा भिसे, संदीप काटे, संजय भिसे, संदेश काटे, संकेत कुटे आणि सोसायटीमधील नागरिक उपस्थित होते.
आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग वेळीच आटोक्यात आणण्यात आली असून आग अधिक पसरण्यापासून बचाव झाला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी प्रारंभिक माहिती आहे.
नगरसेवक श्री शत्रुघ्न काटे यांनी प्रशासनाशी त्वरित समन्वय साधून बचाव व नियंत्रण कार्य वेगाने सुरू राहण्यासाठी पाठपुरावा केला. त्यांच्या तातडीच्या खबरदारीमुळे आणि अग्निशमन दलाच्या जलद कारवाईमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित यंत्रणांकडून याबाबत पुढील तपास सुरू असून, आगीचा प्रादुर्भाव आणि सुरक्षा उपाययोजनांची तपासणी करण्यात येत आहे.

















