न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जून २०१९) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयास नुकतीच भेट दिली. ही घटना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे. हर्डीकर यांनी इतिहास हा घडविली आहे. त्याकरीता हर्डीकर यांचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.
तसेच वाघेरे यांनी हर्डीकर यांना राष्ट्रवादी कार्यालयास भेट देऊन पदाधिकाऱ्यांशी हितगुज करण्यासाठी निमंत्रण देत, पिंपरी चिंचवड शहरातील इतर पक्षांच्या कार्यालयांनाही भेटी देण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी कार्यालयास भेट दिल्यास आपण हर्डीकर यांचे स्वागत करण्यास उत्सुक आहोत, असे पत्र शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना दिले आहे.
या पत्रावर स्थायी समिती सदस्य मयूर कलाटे, पंकज भालेकर, प्रज्ञा खानोलकर, गीता मंचरकर यांच्या सह्या आहेत.













