न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९. जुलै. २०२०) :- जाधववाडी येथील राजे शिवाजीनगर सेक्टर नंबर सोळा छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बस स्थानकाच्या मागील भागात संत सावतामाळी रिक्षा संघटनेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.
भविष्यात शहरातील प्रवासी नागरीकांना थंड हवा व सावली मिळावी तसेच पर्यावरण स्वच्छ राहून नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे येथिल रिक्षा चालक महेश चौधरी यांनी सांगितले.
राजपूत संघटनेचे शहराध्यक्ष शिवकुमारसिंह बायस यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते गणेश राजपूत, रिक्षा संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.












