- सत्ताधारी नगरसेवकाची पालिकेच्या कोविड लॅबला दत्ता सानेंचे नाव देण्याची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९. जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोरोना संशयितांच्या तपासणीसाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात ” कोविड टेस्टिंग लॅब ” सुरु करण्यात आली आहे.
तसेच पालिकेच्या वतीने भोसरी येथे अद्यावत रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. त्यातच सध्या पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व विद्यमान नगरसेवक ” स्वर्गीय कै. दत्ता ( काका ) साने ” यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.
स्वर्गीय कै. दत्ता ( काका ) साने यांचे शहराच्या जडण-घडणीत, विकासात अमुल्य योगदान आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. शहरातील गोरगरिबांना मोफत व चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी दत्ताकाका कायम आग्रही असायचे. पालिका प्रशासनाने भोसरी येथील रुग्णालयाला व वाय.सी.एममधील कोविड लॅबला ” स्वर्गीय कै. दत्ता ( काका ) साने ” यांचे नाव दिल्यास तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. वरील बाब लक्षात घेऊन आयुक्तांनी भोसरी रुग्णालय व वाय. सी. एममधील कोविड लॅबीला “स्वर्गीय कै. दत्ता (काका) साने” यांचे नाव द्यावे, अशी मागणी सत्ताधारी भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी महापालिका आयुक्त हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.












