न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९. जुलै. २०२०) :- आई, वडील रोजंदारीवर मोलमजूरी करणा-या व कुटूंबाला कोणतीही शैक्षणिक पार्श्वभुमी नसतानाही प्राची दिगंबर कांबळे या विद्यार्थीनीने दहावीच्या परिक्षेत ८९.८० टक्के मार्क मिळविले आहेत.
संत तुकारामनगर येथील भारतीय जैन संघटनेच्या शाळेत शिकणा-या प्राचीचे वडील रोजंदारीवर गवंडी काम करतात तर, आई मोलकरीण म्हणून काम करते.
प्राचीला अभियांत्रिकीची पदवी घेऊन पुढे भारतीय प्रशासन सेवेत (आयएएस) जायचे आहे. प्राची कांबळेच्या यशाबद्दल मुख्याध्यापक श्रीकांत कदम आणि असंघटीत कामगार कॉंग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुंदर कांबळे यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.


















