- आज १०३४ बाधित तर ११ जणांचा मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९. जुलै. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात बुधवारी (दि. २९ जुलै) रोजी १०३४ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील ०८ आणि हद्दीबाहेरील ०३ अशा ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
यात भोसरी (पुरुष ५२ वर्षे), पिंपरी (पुरुष ८० वर्षे), दापोडी (पुरुष २७ वर्षे, पुरुष ३२ वर्षे), चिंचवडगाव (पुरुष ८६ वर्षे), दिघी (स्त्री ४० वर्षे), खराळवाडी (पुरुष ६८ वर्षे), निगडी (स्त्री ६५ वर्षे), चाकण (स्त्री ४३ वर्षे), पाषाण (पुरुष ६५ वर्षे), शिरुर (पुरुष ७९ वर्षे) यांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १९४३१ वर पोहोचली आहे. महापालिका रुग्णालयात ३१४२ रुग्ण उपचार घेत आहे. तर, आजपर्यंत शहरातील एकूण ३११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १२२७८ वर पोहोचली आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा सुरु झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.


















