- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केला वृक्षारोपणचा संकल्प…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ सप्टेंबर २०२०) :- देशाचे लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (दि १४) रोजी प्रभाग क्र. २६ वाकड-पिंपळे निलख येथे अजय पाताडे यांच्या प्रमुख उपस्तिथीमध्ये मा. अध्यक्षा-स्थायी समिती व नगरसेविका ममताताई विनायक गायकवाड व मा. नगरसेवक विनायक गायकवाड यांच्या वतीने ‘वृक्षारोपण व पर्यावरण रक्षणाचा संकल्प’ असा कार्यक्रम करण्यात आला. याप्रसंगी २० वृक्षांचे रोपण करण्यात आले व पर्यावरण रक्षणाचा संकल्प करण्यात आला. यावेळी अजय पाताडे, मा. नगरसेवक विनायक गायकवाड व परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला उपस्थित होत्या.
यावेळी देशाचे लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व पर्यावरणाचे संरक्षणचा संकल्प करण्यात आला. नागरिकांना झाडे लावण्यासाठी प्रोत्साहित करून नागरिकांना देखील ही झाडे संरक्षित करण्यासाठी आवाहन करण्यात आले.
मा. नगरसेवक विनायक गायकवाड म्हणाले की “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही पर्यावरण रक्षण व संवर्धन उपक्रम हाती घेतलेला आहे. त्याचा शुभारंभ होत आहे. प्रभागात ठीक-ठिकाणी उपयुक्त वृक्षारोपण करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. या उपक्रमा अंतर्गत ठिकठिकाणी झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे. नागरिकांनी देखील पुढाकार घेऊन आपल्या परिसरात सोसायटीमध्ये झाडे लावून त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी घ्यावी. या उपक्रमा अंतर्गत झाडे पुरवली जातील.”