न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी धन्वंतरी स्वास्थ्य योजना सोमवार (दि. १४) रात्री बारापासून बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यास पुणे औद्योगिक न्यायालयाने एका दिवसाची स्थगिती दिली आहे.
पालिकेचे सेवेतील व सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी धन्वतरी स्वास्थ्य योजना २०१५ पासून सुरू करण्यात आली आहे. ही योजना सोमवारी मध्यरात्रीपासून बंद करण्याचा निर्णय आयुक्तांनी अचानक घेतला आहे. त्या विरोधात पालिका कर्मचारी महासंघाने काळ्या फिती लावून आयुक्तांचा निषेध केला होता.
या संदर्भात महापौर उषा ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली गटनेते, पदाधिकारी व आयुक्तांची बैठक झाली. त्यात आयुक्तांनी धन्वतरी योजना तत्वतः करण्याचे मान्य केले होते. दरम्यान, महासंघाने औद्योगिक न्यायालयात दाद मागत, धन्वंतरी योजना बंद करण्याच्या मागणीसाठी याचिका दाखल केली होती. त्यावर सोमवारी सुनावणी झाली. न्यायालयाचे सदस्य एम. आर. कुंभार यांनी आयुक्त हर्डीकर यांच्या निर्णयाला एका दिवसाची स्थगिती दिली आहे, असे महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी सांगितले.