आष्टी तालुक्यातील खुंटेफळ ग्रामस्थांची केली दिवाळी गोड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ नोव्हेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहर भाजपा वाहतुक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे पाटील यांनी आष्टी तालुक्यातील खुंटेफळ येथे दिपावलीनिमित्त गावातील १९० कुटुंबाला मिठाईचे वाटप करीत, संपुर्ण गावची दिवाळी गोड केली आहे.
गेल्या पाच वर्षांपासून प्रत्येक दिवाळी सणाच्या निमित्ताने गावातील प्रत्येक कुटुंबाला मिठाई वाटप करण्याचा जणू चंगच त्यांनी बांधला आहे. यंदा देखील त्यांनी गावात येऊन प्रत्येक कुटुंबाला मिठाईचे वाटप केले. लॉकडाऊनमध्ये देखील गहु, साखर, रोगप्रतिकारक औषधांचे वाटप करीत त्यांनी सामाज कार्याचा वसा जपण्याचे कार्य सुरु ठेवले आहे.
इंजिनीयर दिपक पाटील मोढवे म्हणाले की, दुष्काळ हा आष्टी तालुक्याच्या पाचवीला पुजलेला आहे. त्यामुळे पोटापाण्यासाठी शेकडो लोकांनी शहराकडे धाव घेतली. परिसरातील ग्रामस्थ काही नोकरी तर काही व्यावसायानिमित्त पुणे, मुंबई, सुरत, अहमदनगर, इंदोर, पनवेल अशा वेगवेगळ्या शहरात स्थायिक झाले. कितीही मोठे झालो तरी, मायभूमीला विसरता येत नाही. ज्या गावात आपण जन्मलो, लहानाचे मोठे झालो, त्या गावची नाळ तुटु द्यायची नाही, असा माझा शिकस्ता आहे. त्यामुळे सामाजिक कार्यात मी नेहमीच अग्रेसर राहणार आहे.