न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ नोव्हेंबर २०२०) :- रहाटणीतील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या वतीने “संविधान दिवस ” साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख प्रसिध्द लेखक बी. एस. कांबळे, निवृत्त पोलीस निरीक्षक सुरेश भालेराव, युवराज प्रगणे यांच्या हस्ते गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, मुख्याध्यापिका कल्पिता डिक्रृज, शिक्षिका सिल्वेनिया जाधव, शिक्षकेत्तर कर्मचारी शोभा नाईक आदी उपस्थित होते .
संविधान दिनाची जनजागृती करण्यासाठी शाळेच्या दर्शनी भागात संविधान दिनाचे उदेशिकाचे भित्तीपत्रक लावण्यात आले. तसेच कांबळे यांनी भारताच्या संविधानाबाबत माहिती दिली. संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांनी संविधान दिन नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन शाळा, कॉलेज व शासकीय, निमशासकीय कार्यालय, महानगरपालिका, ग्रामपंचायत आदी ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात यावा, असे आवाहन केले.
संविधानाच्या उदेशिकाचे सामुहिक वाचन करण्यात आले. तसेच मुंबईवर झालेल्या २६/११ च्या संहारक हल्याच्या कटू स्मुर्तीला उजाळा देत शहीद झालेल्या सर्व जवानांना श्रद्धांजली देण्यात आली.