- आज १६५ जणांना कोरोनाची बाधा; २५९ रुग्णांना डिस्चार्ज तर, ९ रुग्णांचा मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ डिसेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज गुरुवारी (दि. ३ डिसेंबर) रोजी १६५ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे ९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९२९३९ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ८९३२१ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १६४९ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले पाच पुरुष रुग्ण हे पिंपळे गुरव (६५ वर्षे), पिंपरी (५७, ८२वर्षे), थेरगाव (६५ वर्षे), पिंपळे सौदागर (६३ वर्षे) तर, ०२ स्त्रीया या पिंपळे गुरव (७४ वर्षे), संत तुकारामनगर (७० वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवासी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात यापूर्वी मृत झालेले दोन स्त्री रुग्ण या लोहगाव (५३ वर्षे), जुन्नर (७१ वर्षे) येथील रहिवासी आहेत.