न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ डिसेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात कोविड-१९ या प्रादुर्भाव रोगाचा प्रसार झालेला आहे. पालिकेचे कोविड सेंटर अॅटो क्लस्टरमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांनी शहराची सेवा करताना स्वत:ची व परीवाराची कोणतीही पर्वा न करता सेवा केली. पालिका प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता येथील कामगार व कर्मचारी यांना कामावरुन काढलेले आहे. कर्मचा-यांवर अन्याय होत आहे.
या कर्मचा-यांनी कोरोना बाधित रुग्णांची आरोग्य सेवा केली आहे. पिंपरी चिंचवड शहर हे देशातील सर्वांत कमी कोरोना बाधित आकडेवारीचे शहर आहे. यामध्ये या कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे, त्याच कर्मचा-यांना कामावरुन काढून त्यांचा उदरनिर्वाहाचा आधार काढून घेतलेला आहे.
या कर्मचाऱ्यांना त्वरित कामावर रुजू करावे, अशी मागणी उपमहापौर केशव घोळवे यांनी कामगार उपआयुक्त व पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.