- मनसे विरुद्ध अॅमेझॉन वाद आणखी पेटण्याची शक्यता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०२०) :- मराठी भाषेवरुन पुन्हा एकदा मनसेचा वाद पेटल्याचे समोर आले आहे. अॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी मनसेने सुरु केलेल्या मोहिमने आता आक्रमक स्वरुप धारण केले आहे. मात्र या प्रकरणी अॅमेझॉनने न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर आता अॅमेझॉन कोर्टात गेलं.
त्यावरुन दिंडोशी न्यायालयाकडून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि मनसे सचिवांना नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसमध्ये राज ठाकरेंना ५ जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे मनसे विरुद्ध अॅमेझॉन हा वाद आणखी पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अॅमेझॉन इतर राज्यांमध्ये संबंधित भाषेचा वापर करते. मात्र मराठी भाषेचा वापर अॅमेझॉनच्या अॅप किंवा वेबसाईटवर होताना दिसत नाही. त्यामुळे अॅमेझॉनने मराठी भाषेचा वापर करावा, अशी मागणी मनसे गेल्या काही दिवसांपासून करत आहे. या प्रकरणी मनसेच्या शिष्टमंडळाने अॅमेझॉनच्या मुंबईतील कार्यालयाला भेट देत आपली मागणी मांडली होती.