न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. २० डिसें.) :- राष्ट्रसंत गाडगे बाबा सेवाभावी संस्था व शिवगर्जना ग्रुप यांच्या वतीने केशवनगर चिंचवड येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या ६२ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
गुरुवार (दि. २०) रोजी सकाळी ९ वा. केशवनगर येथे संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते जयघोष करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संत गाडगेबाबा चौक व काकडे टाऊनशिप परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
यावेळी नगरसेवक राजेंद्र गावडे, महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे, नरेश कदम, किरण लोंढे, दिलीप शिंदे, सुनील अभंग, प्रशांत दळवी आकाश जवळकर आदी मान्यवर व राष्ट्रसंत गाडगेबाबा सेवाभावी संस्थेचे सभासद व नागरिक आदी उपस्थित होते.
संत गाडगे बाबांबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे म्हणाले की, संस्थेचे सर्व पदाधिकारी दरवर्षी हा कार्यक्रम समाजपयोगी उपक्रमाने व उत्तम पद्धतीने साजरा करतात. संस्थेचे अध्यक्ष नरेश कदम यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष किरण लोंढे यांनी मान्यवर व नागरिकांचे स्वागत केले. सचिव सुनील अभंग यांनी आभार मानले.












