- खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२१) :- आकुर्डीतील महावितरण वीज केंद्र येथे दोन दिवसांमध्ये जमा झालेली १२ लाख २७ हजार ९२० रुपयांची रोख रक्कम आणि काही चेक बँकेत भरण्यासाठी मालकाने नोकराकडे दिली. परंतु, ती रक्कम नोकराने बँकेत न भरता फिर्यादी यांची मोटारसायकल आणि पैसे घेऊन पोबारा केला.
ही घटना २२ एप्रिल रोजी घडली. बाबुराव भैयाराम अग्रवाल (वय ६०) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून रावसाहेब शाहराम कराळे (वय ४५) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. खडकी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.