- घरबसल्या मोबाईलद्वारे बेड मॅनेजमेंटसह इतर माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२१) :- कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुरेशी आणि अचूक माहिती नागरिकांना उपलब्ध नसल्याने नागरिक संभ्रमात असतात. घरबसल्या नागरिकांना मोबाईलद्वारे बेड मॅनेजमेंटसह कोरोना संदर्भातील सर्व माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिकेने ‘मी जबाबदार’ हे मोबाईल अॅप विकसित केले असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
‘मी जबाबदार’ या मोबाईल अॅपचे लोकार्पण आज महापौर ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. गुगल मिट द्वारे ऑनलाईन पध्दतीने झालेल्या या कार्यक्रमात पक्षनेते नामदेव ढाके, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, कार्यकारी अभियंता तथा प्रवक्ता शिरीष पोरेडी, वैद्यकीय अधिकारी तथा वॉर रुमचे समन्वयक डॉ. क्रिस्टोफर झेवियर, संगणक अधिकारी बोरुडे, सुधीर बोराडे आदी उपस्थित होते. तर उपमहापौर नानी घुले व इतर नगरसदस्य आणि पत्रकार ऑनलाईन उपस्थित होते.
‘मी जबाबदार’ या अॅपमुळे नागरिकांना पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रातील मनपाचे खाजगी रुग्णालयातील ICU with ventilators beds, ICU without ventilators beds, isolation bed with oxygen, isolation bed without oxygen, covid care center याची अद्यावत माहिती रुग्णालय, त्याचा फोन नंबर, त्याचे स्थळ, त्याचे गुगल मॅप व संबंधित समन्वयक यासह मिळणार आहे. जेणेकरुन त्या फोन नंबरवरुन संबंधित व्यक्ती रुग्णालयाशी संपर्क साधून कोविड रुग्णासाठी बेड विनासायास उपलब्ध कर शकणार आहे.
Tele Medicine Helpline, बेड मॅनेजमेंट हेल्पलाईन व स्वास्थ हेल्पलाईन सुध्दा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. जेणेकरुन त्याच्यावरुन संबंधितांना थेट फोन लावता येणार आहेत. कोविड -१९ टेस्टींग सेंटर याची गावनिहाय / झोननिहाय फोन नंबरसह यादी उपलब्ध आहे. ज्याच्यावरुन प्रत्यक्ष टेस्टींग सेंटरला फोन करता येणार आहे व माहिती उपलब्ध होणार आहे. कोविड -१९ प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र (Vaccination Center) मनपा हद्दीतील माझ्या जवळील लसीकरण केंद्र कुठे आहे त्याचा गुगल मॅप, त्याचा फोन नंबर व त्याचे स्थळ यासह संपुर्ण शहरातील लसीकरणाच्या स्थळांची माहिती या अँपद्वारे नागरिकांना उपलब्ध होणार आहे.
तसेच पिंपरी चिंचवड मनपाद्वारे राज्य शासनाद्वारे, केंद्र शासनाद्वारे ज्या काही सूचना अधिसूचना जारी होतील त्यासुध्दा या अँपद्वारे सगळ्यांना उपलब्ध होणार आहे, अशी कोविड -१९ बाबतची संपुर्ण माहिती नागरिकांना या अँपद्वारे मनपाने उपलब्ध करुन दिलेली आहे. मनपाचे वेबसाईट (www.pcmcindia.gov.in ) “ कोविड -१९ ” पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्वतःचे वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवरती कोविड -१९ हा टॅब लाल अक्षरामध्ये दर्शविलेला आहे. ज्यामध्ये कोविड -१९ बाबतची मनपाची नियमावली, कोविड १९ बाबत जबाबदार अधिकारी व कामकाजाबाबतची माहिती, कोविड -१९ डॅशबोर्ड, प्रतिबंधित क्षेत्र माहिती, कोविड लसीकरण केंद्राची माहिती, विविध व्यवसाय / अस्थापना सुरु करणेबाबत मार्गदर्शक तत्वे, गृह विलगीकरणासाठी कार्यरत मार्गदर्शक तत्वे, बेड मॅनेजमेंट इ. माहिती उपलब्ध आहे. सदरची महिती वेबसाईटवर उपलब्ध असल्याने नागरिकांनी जास्तीत जास्त वेबसाईटचा वापर करुन आवश्यक ती माहिती उपलब्ध करुन घ्यावी. सद्यस्थितीमध्ये मनपा वेबसाईटचे १४ लाख Hits आहेत.
Twitte: Handle टॅब लाल अक्षरामध्ये दर्शविलेला आहे. ज्यामध्ये कोविड -१९ बाबतची मनपाची नियमावली, कोविड १९ बाबत जबाबदार अधिकारी व कामकाजाबाबतची माहिती, कोविड -१९ डॅशबोर्ड, प्रतिबंधित क्षेत्र माहिती, कोविड लसीकरण केंद्राची माहिती, विविध व्यवसाय / अस्थापना सुरु करणेबाबत मार्गदर्शक तत्वे, गृह विलगीकरणासाठी कार्यरत मार्गदर्शक तत्वे, बेड मॅनेजमेंट इ. माहिती उपलब्ध आहे. सदरची महिती वेबसाईटवर उपलब्ध असल्याने नागरिकांनी जास्तीत जास्त वेबसाईटचा वापर करुन आवश्यक ती माहिती उपलब्ध करुन घ्यावी.
Twitter Handle मनपाचे स्वतःचे २ Twitter खाते आहेत. @ pcmcindiagovin या Twitter ला १४ लाखांपेक्षा अधिक लोक पाहत असून ३०,३४० Followers आहेत. तसेच @pcmcsarthi नावाचे दुसरे Twitter account असून त्यास ६ लाख १८ हजार लोकांनी पाहिलेले असून १३,०५५ इतके Followers आहेत. Twitter account वर कोरोना संदर्भात ज्या काही सूचना / तक्रारी येतात त्याची तात्काळ दखल घेवून संबंधित विभागाला कळवून त्याचे निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
Facebook Page महापालिकेचे २ Facebook account आहेत. Pimpri Chinchwad Municipal Corporation या Facebook account चे ३०,७४६ Followers आहेत आणि दुसरे pcmcsmartsarthi या Facebook account चे १२,५३३ Followers असून १,५९,५०९ Impressions आहेत. Youtube Channel पिंपरी चिंचवड मनपाचे स्वतःचे Youtube Channel आहेत. त्या Channel चे नाव Pimpri Chinchwad Municipal Corporation नाव असून ३०४६ Subscribers असून १.२०,७४६ Viewers आहेत. त्याचप्रमाणे pcmcsmartsarthi नावाचे दुसरे youtube channel आहे. त्याचे ४३६५ Subscribers असून त्याचेही १,२०,००० Viewers आहेत.
Smart Sarthi App पिंपरी चिंचवड मनपा कार्यक्षेत्रात नागरिकांना ज्या काही तक्रारी, अडी – अडचणी माहिती हवी असल्यास सदरबाबत ८८८८००६६६६ या क्रमांकावर फोन करुन आपण आपली तक्रार नोंदवू शकता. आवश्यक ती माहिती मागवू शकता. सदरची हेल्पलाईन २४x७ सुरु असते. सदरच्या हेल्पलाईनला एका वर्षामध्ये ६.७३ कोटी नागरिकांनी संपर्क साधलेला आहे. त्यापैकी ५.०१ कोटी नागरिकांना प्रश्नांची उत्तरे देण्यात आलेली आहेत. त्याची व्याप्ती पाहता ८४ % नागरिकांशी द्विसंवाद साधलेला आहे. हे अॅप आज पर्यंत १,३१,०२५ नागरिकांनी डाऊनलोड केले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने Social Media चा वापर नागरिकांनी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व अद्यावत सोयी – सुविधा वरीलप्रमाणे उपलब्ध करुन दिलेल्या असून त्या सगळ्यांची माहिती महापौर, उपमहापौर, पक्षनेते व गुगल मिट द्वारे उपस्थित असणाऱ्या सर्वांनी सादरीकरण पाहिले. मनपाच्या या सर्व उपक्रमांबाबत महापौर, उपमहापौर, पक्षनेते यांनी आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करुन जास्तीत जास्त लोकांनी या सर्व माध्यमांचा जास्तीत जास्त उपयोग आणि वापर करुन घ्यावा व मनपाने उपलब्ध केलेल्या सर्व सुविधांचे मनःपूर्वक कौतुक केले व संबंधितांना शुभेच्छा दिल्या.