न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ मे २०२४) :- डॉ. रेखा मोहन भोळे यांना रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त ‘रबिंद्ररत्न’ पुरस्कार २०२४’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मान्यवरांच्या हस्ते नुकताच त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात झाली. शैक्षणिक जागरूकता त्याप्रमाणेच महिलांसाठी मोलाचे मार्गदशन व त्यांना स्वावलंबी जीवन जगण्यासाठी त्यांनी केलेले विशेष प्रयत्न उल्लेखनीय आहेत.