न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ मे २०२४) :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता 204 मावळ विधानसभा मतदार संघांतर्गत मावळ विधानसभा मतदारसंघातील समन्वय अधिकारी, मतदान केंद्रावर प्रत्यक्ष काम करणारे केंद्रप्रमुख, व सहाय्यक अधिकारी कर्मचारी असे सकाळचे सत्रात 876 व दुपारचे सत्रात 950 कर्मचारी यांना (दि. ०५) रोजी मतदान प्रक्रिया ईव्हीएम व व्हीव्हीपॅट हाताळणी बाबत दुसरे प्रशिक्षण तळेगांव येथील नूतन महाराष्ट्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे देण्यात आले.
त्याचबरोबर अधीक्षक डॉ. वर्षा पाटील ग्रामीण रुग्णालय वडगाव यांनी पीपीटी द्वारे मतदानाच्या दिवशी उष्माघात व इतर वैद्यकीय इमर्जन्सी निर्माण झाल्यास करावयाच्या उपायोजनाबाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच प्रत्येक रुग्णालयामध्ये उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याबाबतही संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी यांना माहिती दिली.
यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विक्रम देशमुख, निवासी नायब तहसीलदार तथा प्रशिक्षण विभाग प्रमुख गणेश तळेकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.