न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. २७ डिसें.) :- चिखलीतील पोलीस ठाण्याच्या परिसरात नराधम चुलत भावाने अल्पवयीन मूकबधिर बहिणीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पॉक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २७ वर्षीय आरोपी हा एका खासगी कंपनीत कामाला आहे. चुलता आणि चुलती यांची नजर चुकवून तो बहिणीला स्वतःच्या घरी घेऊन गेला आणि हे कृत्य केलं. ११ डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेबाबत तक्रार दाखल करण्यात आली.
घरचं प्रकरण असल्याने तक्रार दाखल करण्यास उशीर झाल्याचं समजतंय. तक्रार दाखल झाल्यानंतर याप्रकरणी नराधम चुलत भावाला चिखली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.घटनेचा अधिक तपास चिखली पोलीस करत आहेत.












