न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २७ डिसें.) :- पुण्यातील भाजपाचे स्वीकृत नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष गणेश बीडकर यांच्या पायाला त्यांच्याच पिस्तुलातून सुटलेली गोळी लागल्याची घटना घडली असून, त्यांच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
गणेश बीडकर हे गुरुवारी दुपारी वढू जवळील अपटी या गावामध्ये असलेल्या फार्म हाऊसवर गेले होते. साडेबाराच्या सुमारास पिस्तूल साफ करताना ट्रिगर दाबला गेला आणि एक गोळी त्यांच्या पायाला लागली. या घटनेत गणेश बीडकर हे जखमी झाले असून त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. बीडकर यांच्याकडे पिस्तूलीचा परवाना आहे का, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.












