- निगडीतील घटना; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जुलै २०२१) :- महिला या घरासमोर तंबाखू चोळत उभ्या असताना दारुडा तिथे आला. त्याने फिर्यादी महिलेकडे तंबाखू मागितली. तंबाखू देण्यास नकार दिला असता आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ केली. दुसरा आरोपी तिथे आला त्यानेही फिर्यादी यांना शिव्या दिल्या. त्यामुळे फिर्यादी यांनी देखील आरोपीला शिवीगाळ केली.
त्यावरून दोन्ही आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मुलाला मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी यांच्याशी गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला. हा प्रकार रविवारी (दि. ४) दुपारी लहुजी वस्ताद झोपडपट्टी, प्राधिकरण निगडी येथे घडला.
पीडित महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बाळू मुजमुले (वय ६०), दीपक मुजमुले (वय २२, दोघे रा. लहुजी वस्ताद झोपडपट्टी, प्राधिकरण निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. निगडी पोलीस तपास करीत आहेत.















