- भोसरीतील पसायदान कॉलनीत आरोपींची दहशत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जुलै २०२१) :- ‘मी भोसरीचा भाई आहे’ असे म्हणत परिसरात दहशत निर्माण केली. नागरिक आरोपींना पाहून सैरावैरा पळाले. दहशत निर्माण करून आरोपी तिथून निघून गेले. फिर्यादीचा मुलगा स्वराज प्रकाश कराळे हा कोठे आहे, त्याला बाहेर काढ, अशी आरोपींनी दमबाजी केली.
आरोपीने फिर्यादी यांच्या छातीला पालगन लावून त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. तसेच फिर्यादी यांच्या शर्टाच्या खिशातून एक हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. फिर्यादी यांच्या कारवर दगड मारले. दहशत निर्माण करून आरोपी तिथून निघून गेले. ही घटना सोमवारी (दि. ५) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास पसायदान कॉलनी, भोसरी येथे घडली.
याबाबत प्रकाश नामदेव कराळे (वय ५५, रा. पसायदान कॉलनी, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रुपेश पाटील (वय अंदाजे २८), किरण कदम (वय अंदाजे २७), दशरथ देवकाते (रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
















