- पिंपळे निलखमधील घटना; सांगवी पोलिसांची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जुलै २०२१) :- पिंपळे निलख परिसरात रस्त्याने जाणाऱ्या वाहन आणि नागरिकांवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन गुंडाची सांगवी पोलिसांनी धिंड काढली.
प्रवाशांना मारहाण करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता पोलिसांनी धिंड काढल्याचाही व्हिडिओ व्हायरल झाला आहे. रविवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास पिंपळे निलख येथील रस्त्यावर प्रतीक खरात, चेतन जावरे या दोन गुंडांनी गाड्या अडवून कोयत्याने वार केले.
त्याच रस्त्यावर सांगवी पोलिसांनी या दोन्ही आरोपीची धिंड काढून चांगलाच धडा शिकविला. याबाबत सांगवी पोलिसांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, त्या आरोपींना घेऊन घटनास्थळ पाहण्यासाठी पायी गेलो असता कुणी तरी व्हिडीओ तयार केला असावा.
















