- भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जुलै २०२१) :- कंपनीच्या काम निघाले म्हणून तरुणी मंगळवारी रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास भोसरी पोलीस ठाण्यात आली. कार पोलीस ठाण्याच्या व्हिजीटर पार्किंगमध्ये पार्क केली. पोलीस ठाण्यात येत असताना ओळखीचा व्यक्ती पोलीस ठाण्यासमोर भेटला.
त्याने फिर्यादी यांना पाहून ‘मॅडम तुम्ही रात्री इकडे कसे काय?’ अशी विचारणा केली. त्यावेळी तरुणीने कंपनीच्या काम आले म्हणून पोलीस स्टेशनला आल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपीने अश्लील बोलून महिलेच्या चारित्र्या विषयी अपशब्द वापरून त्यांचा विनयभंग केला.
पीडित तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रवींद्र शिवाजी पोमण (वय ५७, रा. रहाटणी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
















