- दोघांची तरुणाला मारहाण व धमकी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जुलै २०२१) :- ‘आम्हाला पाहून गाडीचा हॉर्न वाजवतो का, तू इथला भाई झाला का’, आरोपीने हाताने आणि पट्ट्याने आरोपीने एकाला मारहाण केली. दुसऱ्या आरोपीने देखील देखील मारहाण करत शिवीगाळ केली. ‘तू जर आमची तक्रार पोलिसात केली तर तुला काळेवाडीत राहू देणार नाही’. अशी आरोपींनी फिर्यादींना धमकी दिली.
त्यानंतर दोघे आरोपी दुचाकीवरून निघून गेले. ही घटना सोमवारी (दि. ५) रात्री भारतमाता चौक, काळेवाडी येथे घडली. दीपक चंद्रकांत गायकवाड (वय १९, रा. नढेनगर, काळेवाडी) याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरज लोंढे, साहिल शेख (दोघे रा. भारतमाता कॉलनी, काळेवाडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
















